काँग्रेस पक्षाशिवाय देशात कोणतीही प्रमुख आघाडी होणं अशक्य : संजय राऊत

0

जळगाव : काँग्रेस पक्ष सध्या काहीसा कमकुवत वाटत असला तरी देशाच्या पातळीवर काँग्रेस पक्षाशिवाय कोणतीही प्रमुख आघाडी होणं अशक्य आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत  यांनी म्हटलं आहे. संजय राऊत सध्या खान्देश दौऱ्यावर आहेत. आज ते जळगावमध्ये बोलत होते. ते म्हणाले की, काँग्रेस हा जुना पक्ष आहे आणि आजही त्यांची अनेक राज्यांमध्ये चांगली पकड असल्याचं दिसून येते. भक्कम विरोधी पक्ष उभारणीसाठी सर्वच प्रादेशिक पक्षांची मजबूत आघाडी होणे गरजेचे असल्याची आपली नेहमीच मागणी राहिली आहे, असं राऊत म्हणाले. मोदींना पर्याय म्हणून विरोधकांकडून चाचपणी केली जात आहे का? असा प्रश्न राऊत यांना विचारला होता. प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की, प्रशांत किशोर हे काही कुठल्या राजकीय पक्षाचे नेते नाहीत. प्रशांत किशोर हे प्रोफेशनल पॉलिटिकल स्टॅटिजिस्ट आहेत. त्यांनी आमच्यासाठी काम केले आहे, काँग्रेससाठी काम केले आहे. त्यांच्यासोबत अनेक राजकारण्यांच्या भेटी होत असल्या तरी त्या पक्षाच्या विस्ताराच्या संदर्भात होऊ शकतात. त्यामुळे प्रशांत किशोर हे शरद पवार यांना भेटल्याने कोणतीही राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता नाही असं राऊत यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:31 PM 12-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here