राज्याचे परिवहन, संसदीय कार्यमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवार २० जानेवारी २०२० रोजी सकाळी १०.३० वाजता अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी संबधितानी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती, रत्नागिरी यांनी कळविले आहे.
