कोकणनगर वासियांचा लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

रत्नागिरी : शहरातील कोकणनगर येथील वार्ड क्र. ४ मध्ये राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, नगराध्यक्ष बंड्या साळवी, उद्योजक किरण सामंत यांच्या प्रयत्नाने तसेच जिल्हा प्रशासन यांचे निर्देश व सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन रत्नागिरी नगर परिषद आणि रत्नागिरी जिल्हा रुग्णालय यांचे संयुक्त नियोजनाने कोकण नगर आणि किर्तीनगर वॉर्ड क्र.04 मध्ये लसीकरण रविवारी संपन्न झाले. कोकणनगर मधील अनेक युवा कार्यकर्त्यांनी या लसीकरणाला मोलाची साथ दिली. त्यामध्ये प्रामुख्याने रा.काँ.युवा नेते श्री.नौसीन काझी, रा.काँ.महिला शहर अध्यक्ष सौ. सायमा काझी, श्री.फैसल मुल्ला, ॲड. श्री.अल्तमश झारी, श्री.कझीम शेख, श्री.बुरहान काझी, श्री. सलमान अल्जी, श्री.सैफअली खान या युवक वर्गाने मोलाची साथ दिली. कोकणनगर मधील वरीष्ठ नागरीक यांनीही चांगले सहकार्य केले. त्यामध्ये नगरसेवक श्री.मुसा काझी, विभाग प्रमुख श्री.आप्पा पूनसकर, शाखाप्रमुख श्री.यासीन नाईक, महिला विभाग प्रमुख सौ.वंदना सावंत, उपविभाग प्रमुख श्री.तन्वीर मुजावर, रा.काँ.चे युवा नेते श्री.जावेद परदेसी हे सहभागी होते. रत्नागिरीतील कोकणनगर येथील वार्ड क्र. ४ मधील लसीकरण सुरु असताना नगराध्यक्ष श्री. बंड्याशेठ साळवी आणि नगरसेविका सौ.कौशल्या शेट्ये यांनी उपस्थिती दाखवली होती. उद्योजक सौरभ मलुष्टे यांनी या लसीकरणासाठी रिक्षा उपलब्ध करून दिली. कोकणनगरमधील लसीकरणाला तेथील नागरीकांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला होता आणि लसीकरण शांततेत पार पाडण्यास सहकार्य केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:28 AM 14-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here