वळणाचा अंदाज न आल्याने वेरळ घाटामध्ये ट्रेलर फसला

0

लांजा : वळणाचा अंदाज न आल्याने मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रेलर साईडपट्टीवर फसल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ घाटामध्ये शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्याने घडली. यामुळे महामार्गावर दोन तास एकेरी वाहतूक सुरू होती. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम पावसाळ्यात थांबविण्यात आले आहे. लांजा शहरामध्ये ओव्हर ब्रिजसाठी प्लेअर उभारण्यास ड्रिल मारण्याचे काम पावसाळ्यात बंद करण्यात आले आहे. त्यामुळे ही ड्रील मशीन घेऊन ट्रेलर मुंबईच्या दिशेने सकाळी ८ वाजता निघाला होता. वेरळ घाटातील यु आकाराच्या वळणावर उतार उतरत असताना चालकाला वळणाचा अंदाज आला नाही. त्यामुळे साईटपट्टीवर ट्रेलरचे पुढील चाक मातीत रुतले. त्यामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहणाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ट्रेलरला थोडासे बाजूला केल्यानंतर दोन तासाने वाहतूक सुरळीत करण्यात आली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:21 PM 14-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here