आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांची थेट ब्रिटनच्या महाराणीचे वकिल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रिटनच्या न्यायमंत्र्यांने नव्या नियुक्त्या संदर्भातील यादी प्रसिद्धी केली आहे. त्यामध्ये मराठमोळे हरिश साळवे यांच्या नावाचा समावेश आहे. कायदा आणि वकिलीच्या क्षेत्रामध्ये महत्वाची आणि मोठी कामगिरी करणाऱ्यांना ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून निवडले जाते. साळवे यांचे आंतरराष्ट्रीय कायदाक्षेत्रातील मोठे योगदान असल्याने त्यांना हा बहुमान मिळाला आहे, असल्याची माहिती आहे. हरीश साळवे ब्रिटनच्या महाराणीसाठी कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठीचे ‘क्वीन काऊंसिल’ म्हणून काम पाहतील. 16 मार्च रोजी हरीश साळवे यांची अधिकृतपणे नियुक्ती होईल. दरम्यान, हरीश साळवे यांनी फक्त एक रूपयांचं मानधन घेऊन कुलभूषण जाधवांची बाजू आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडली होती.
