उक्षी बौद्धवाडी येथील गटारकामाविरोधात तक्रार

0

रत्नागिरी : उक्षी बौद्धवाडीमध्ये जे गटार खोदण्यात आले आहे. ते काम नियमात झालेले नाही. निकृष्ट दर्जाचे हे काम असून त्याची चौकशी करण्याची मागणी माजी सरपंच अन्वर गोलंदाज यांनी केली आहे. ग्रामनिधीच्या १५% मधून बौद्धवाडी येथे गटाराचे काम करण्यात आले असून सदरील काम नियमबाह्य असल्याचा आरोप गोलंदाज यांनी केला आहे. २ फूट खोल आणि २ फूट रुंद तर ४५० मीटर लांब असे गटार करायचे होते. मात्र प्रत्यक्षात हे गटार ६ इंच खोल आणि १ फूट रुंद असे खोदण्यात आले. ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांनी ५०,००० हजार रुपयाचा चेक संबंधित ठेकेदारला अदा केला आहे. या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी गोलंदाज यांनी केली आहे. या कामाबाबत शाखा अभियंता टिके यांना विचारले असता सदरील काम ठेकेदार नंतर पूर्ण करणार असल्याची ग्वाही दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:52 PM 14-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here