मंडणगड-नालासोपारा एसटी सुरू

0

रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील तिडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या मागणीवरून मंडणगड तिडे ठाणे नालासोपारा अशी बससेवा सुरू करण्यात आली आहे. ही बस मंडणगड येथून दुपारी दीड वाजता सुटून केळवत, कुंबळे, तिडे, तळेघर, सडे, आतखोल, शेनाळे, म्हाप्रळ, चिंबाव, तुडील, महाड, माणगाव, कोलाड, नागोठणे, वडखळ, रामवाडी, पनवेल, कोकणभवन, नेरूळ, कळवा, ठाणे, घोडबंदर, वसई फाटा मार्गाने नालासोपारा येथे रात्री ९ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासाकरिता ही गाडी नालासोपारा येथून सकाळी साडेसहा वाजता सुटणार आहे. या बसचे संगणकीय आरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. या बससेवेचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटीचे रत्नागिरीचे विभाग नियंत्रक सुनील भोगरे, विभागीय वाहतूक अधिकारी सचिन सुर्वे, अनंत जाधव, मंडणगड आगार व्यवस्थापक हनुमंत फडतरे, वाहन परीक्षक श्री. भिसे, कोकण एसटीप्रेमी ग्रुपचे अध्यक्ष अपेक्षित कुळ्ये, उपाध्यक्ष विकास गुरव, संवाद कार्यकारिणी संघ पुणे आणि पुणे कल्याण मार्गे सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती, कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समितीचे कल्याण. दापोली, मंडणगडचे संपर्क प्रमुख तथा तालुकाध्यक्ष वैभव बहुतुले आदींनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:02 PM 14-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here