रिलायन्स फाउंडेशन च्या वतीने रत्नदुर्ग माउंटेनिअर्स कडून करण्यात आले जिन्नस वाटप

0

रत्नागिरी : रिलायन्स फाउंडेशन या सेवाभावी संस्थेमार्फत गहु आटा, तेल पिशवी, मीठ, साखर, तूरडाळ, हळद अशा जीवनावश्यक गोष्टींची किट करण्यात आली. ही किट गरजू लोकांच्या पर्यंत पाहचवण्याची जबाबदारी रत्नागिरीतील काही संस्थाना देण्यात आली. या मध्ये खारीचा वाटा उचालत टीम रत्नदुर्ग माउंटेनिअर्सने रत्नागिरी व आजूबाजूच्या परिसरातील गरजू कुटुंबात ही मदत पोच करण्याचे नियोजनबद्ध व कौतुकास्पद काम पार पाडले. लॉकडाऊन मध्ये खरोखर गरजू लोकांपर्यंत पोहचण्यासाठी तहसीलदार साहेब, सरपंच, काही वाडी वाडी मधील कार्यकर्ते, यांच्या मार्गदर्शनाखाली एक लिस्ट बनवण्यात आली आणि त्या लिस्ट प्रमाणे वाटप करण्यात आले. यामध्ये रिलायन्स एम्प्लॉई श्री राजेश कांबळे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. सध्याच्या लॉकडाऊन च्या काळात अनेक संस्था व त्यातील कार्यकर्ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी धडपड करत आहेत. रात्रंदिवस धडपडत आहेत. त्यांच्या सोबतच रिलायन्स फाउंडेशन मुळे आम्हालाही असल्या कामात एक खारीचा वाटा उचलता आला त्याबद्दल टीम रत्नदुर्ग चे अध्यक्ष श्री विरेंद्र वणजू यांनी रिलायन्स फाउंडेशन चे आभार मानले. तर गरीब आणी गरजू या मध्ये असणारा फरक जवळून अनुभवाला असे भावनिक मत सेक्रेटरी गौतम बाष्टे यांनी व्यक्त केले. नुकतेच कोरोना या आजारावर मात करून धडाडीने कामात सहभागी झालेल्या श्री सनील डोंगरे यांचेही टीम रत्नदुर्ग कडून विशेष कौतुक करण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:28 PM 14-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here