परदेशात जाणाऱ्यांसाठी लस देण्याबाबत चिपळूणात नियोजन

0

चिपळूण : परदेशात विविध कारणांसाठी प्रवासासाठी जाणाऱ्या शहर परिसरातील नागरिकांना मंगळवारी कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस देण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. चिपळूण नगर परिषद नागरी आरोग्य सुविधा केंद्र व शासनाचा आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून या मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. शहर परिसरातील परदेशात जाण्यासाठी इच्छुक असलेल्या नागरिक व विद्यार्थ्यांसाठी हे नियोजन करण्यात आले आहे. मंगळवारी शहरातील एल टाईप शॉपिंग सेंटर येथे १८ वर्षे पूर्ण झालेल्यांसाठी सकाळी ९:३० ते २ या वेळेत कोव्हिशिल्डचा पहिला डोस दिला जाणार आहे. त्यासाठी सोमवार दि. १४ रोजी सकाळी ११ ते दु. २ या वेळेत पोलिस वसाहत सभागृहात संबंधितांना नावनोंदणी केल्यानंतर टोकन दिले जाणार आहे. दीडशे नागरिकांना लस दिली जाणार आहे. लसीकरणासाठी येताना पासपोर्ट, आधार कार्ड, आयडी प्रूफ, पॅनकार्ड सोबत असणे बंधनकारक आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:18 PM 14-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here