0

तीन पायाच्या कासवाला मच्छीमारांनी दिले जीवदान

➡ मालवण : मालवणमधील वायरी समुद्रकिनारी ॲालिव्ह रिडले प्रजातीतील एक कासव जाळ्यात अडकलेल्या स्थितीत शनिवारी वाहून आले होते. स्थानिक मच्छीमार प्रवीण बांदकर, नीलेश केळुसकर, संजय जोशी यांनी या कासवाला पाहिले, मात्र पूर्णपणे जाळ्यात अडकून पडलेल्या स्थितीत असलेल्या या कासवाला सागर जीव रक्षक जगदीश तोडणकर, बाबा मोरजकर, दिलीप घारे यांच्या मदतीने जाळ्यातून सोडवले. कासवाचा पुढचा उजवा पाय नव्हता. समुद्रात झटापटीत अथवा अन्य कोणत्या तरी कारणाने हा पाय तुटला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. एक पाय नसला तरी तीन पायावर कासव योग्य प्रकारे हालचाल करत होते. जगदीश तोडणकर यांनी वन विभाग आणि कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यु फोरम टीमला घटनेची खबर दिली. त्यानंतर कोकण वाईल्डलाईफ रेस्क्यु फोरमचे फोरमचे अध्यक्ष अनिल गावडे, उपाध्यक्ष आनंद बांबर्डेकर आणि सदस्य संजयकुमार कुपकर आदींची टीम वायरी जाधववाडी येथे दाखल झाली. त्यानंतर काहीवेळाने वनविभागाचे वनक्षेत्रपाल श्रीकृष्ण परीट, वनरक्षक धामापूर सारीक फकीर आणि वन कर्मचारी अनिल परब आदींचे पथक दाखल झाले. वन अधिकाऱ्यांनी कासवाला ताब्यात घेत उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले प्राथमिक उपचार करण्यात आले. उपचाराअंती पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात तोंडवळी समुद्रात शनिवारी सायंकाळी सोडण्यात आले. अशी माहिती वनरक्षक सारीक फकीर यांनी दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:00 PM 14-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here