देशात 24 तासात 70,421 नवे कोरोना रुग्ण

0

नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासात भारतात 70,421 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 3921 नागरिकांचा मृत्य झाला आहे. 1,19,501 नागरिक बरे झाले आहेत. भारतात कोरोनाचे 2,95,10,410 रुग्ण झाले असून एकूण 2,81,62,947 नागरिक बरे झाले आहेत. एकूण सक्रीय रुग्ण संख्या 9,73,158 झाली आहे. देशात मृतांचा आकडा 3,74,305 आहे.

आतापर्यंत देशात 25,48,49,301 नागरिकांचे लसीकरण झाले. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण 14,92,152 नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण 37,96,24,626 चाचण्या घेण्यात आल्या.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:06 PM 14-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here