चार्टर्ड अकाउंटन्ट्स अंतिम परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. या परीक्षेला 15003 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 2268 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी 15.12 टक्के आहे. या परीक्षेत देशातून कोलकाता येथील अभय बजोरिया आणि नोएडातील सूर्यांश अग्रवाल हे दोघे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. जुन्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत मुंबईचा धवल चोप्रा देशातून तिसरा आला आहे. प्रथम आलेल्या अभय बजोरिया आणि सुर्यांश अग्रवाल यांना 800 पैकी 603 गुण (75.38 टक्के) मिळाले आहेत. कोलकात्याचाच ध्रुव कोठारी 800 पैकी 577 गुण (72,13 टक्के) मिळवून दुसरा आला. अहमदाबादच्या दर्शन शहा याने 800 पैकी 575 गुण (71.88 टक्के) मिळवून तिसरा क्रमांक पटकावला आहे.
