“पुढील पीढीसाठी पृथ्वीचे आरोग्य सुदृढ ठेवण्याची आपली जबाबदारी”: पंतप्रधान नरेंद्र मोदी

0

नवी दिल्ली : पुढील पीढीसाठी पृथ्वीला सुदृढ ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. चांगले हवामान आणि चांगल्या प्रकारची भूमी पुढच्या पीढीला देणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. संयुक्त राष्ट्राच्या उच्चस्तरीय बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थिती लावली. त्यावेळी ते बोलत होते.

संयुक्त राष्ट्राची ही बैठक वाढणारे वाळवंट, मोठ्या प्रमाणावर होत असलेली जमिनीची धूप, जमिनीचा ऱ्हास आणि दुष्काळ या तीन मुद्द्यांवर केंद्रीत होती. मानवामुळे भूमीचे मोठे नुकसान झाले असून, ती चूक दुरुस्त करण्याची सामूहिक जबाबदारी आपली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

जमिनीच्या ऱ्हासाचा जगावर परिणाम
जमिनीच्या ऱ्हासाचा परिणाम जगाच्या दोन तृतीयांश भागावर झाला असून, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याचा मोठा प्रभाव समाज, अर्थव्यवस्था, खाद्य सुरक्षा, संरक्षण आणि गुणवत्ता पडणार आहे. जमीन, स्रोत आणि संसाधने यांचा होणारा ऱ्हास कमी करणे आपली प्राथमिकता असली पाहिजे, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. भारताने धरित्रीला नेहमी महत्त्व दिले आहे. भारतात धरती पवित्र मानली जाते. एवढेच नव्हे, तर धरणीला मातेचे स्थान भारतात आहे. जमिनीच्या ऱ्हासाचा मुद्दा भारतानेच सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय स्तरावर आणल्या, असेही मोदी यांनी सांगितले.

जमिनीचा पोत सुधारण्यावर भर
भारतात अनेक ठिकाणी जमिनीचा पोत सुधारण्यावर भर देण्यात येत आहे. जमिनीचा पोत सुधारला की, उत्पादन क्षमतेत वाढ होऊन चांगली गुणवत्ता कायम राहू शकते. याशिवाय खाद्य सुरक्षा आणि मिळकतीत यामुळे वाढ होऊ शकते. यासंबंधित काही उपाय, प्रयोग देशभरात करण्यात आले, असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलतना सांगितले. तसेच सन २०३० पर्यंत २६ दशलक्ष हेक्टरवर झालेली जमिनीची झीज भरून काढण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, यासाठी अनेकविध प्रयोग, उपाय सुरू केले असून, यामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण होण्यास मदत होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:53 PM 15-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here