‘रेशन दुकानदारांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करावे’

0

चिपळूण : कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन रेशन दुकानदारांना थंबने पॉस मशिनद्वारे धान्य वाटप करण्याची संघटनेतर्फे मागणी करण्यात आली होती. मात्र, ही मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. तसेच अन्य मागण्यादेखील करण्यात आल्या होत्या. त्याकडे देखील शासनाने दुर्लक्ष केले आहे. रेशन दुकानदारांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून सोयी सुविधा उपलब्ध करण्यास शासनाला नेमकी कोणती अडचण आहे? असा सवाल रत्नागिरी जिल्हा रेशनिंग दुकानदार केरोसीन मालकचालक संघटनेचे अध्यक्ष अशोक कदम यांनी उपस्थित केला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी व पुरवठा अधिकारी यांच्याकडे दिले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:26 PM 15-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here