‘कोण आहेत हे तुषार भोसले?’; अजित पवारांचा खास शैलीत टोला

0

ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांचा पायी पालखी सोहळा झाला पाहिजे याच मताचे आम्ही आहोत. एव्हाना कोरोना संकट नसतं तर आम्ही देखील या पालख्यांचे स्वागतच केले असते. पण सध्या कोरोना संकट असल्यानेच बसने वारीचा निर्णय घ्यावा लागला, हे स्पष्ट करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांच्यावर देखील आपल्या खास शैलीत निशाणा साधला. यंदा पण राज्य सरकारने बसनेच आषाढी वारी सोहळ्याला परवानगी दिली आहे. याबाबतचा आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे. मात्र पायी वारी सोहळ्याला परवानगी द्या, अन्यथा पायी वारी काढणारच असा इशारा भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी राज्य सरकारला दिला होता. याबाबत अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी कोण तुषार भोसले? असा प्रतिसवाल उपस्थित करत टोला लगावला. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तीने अशाप्रकारे विधान केले तर कितपत गांभीर्याने घ्यायचे ते वेगळे आहे. आम्ही वारकरी संप्रदायाशी चर्चा करूनच हा निर्णय घेतला आहे. आम्ही देखील पालख्या निघाव्यात याच मताचे आहोत. पण ते सत्तेत नाही म्हणून काहीही बोलत आहे. कुंभमेळा किंवा ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या त्या ठिकाणी कोरोना वाढला आहे. कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे वारकऱ्यांना निर्बंधांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:16 PM 15-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here