तालुक्यातील मोरोशी येथील श्रीदेवीदेसोबाई माध्यमिक विद्यालयाचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी शिवाजी कानडे यांना राजापूर तालुका माध्यमिक अध्यापक संघाचा यावर्षीचा आदर्श सेवक पुरस्कार जाहीर झाला आहे. राजापूर तालुका माध्यमिक अध्यापक संघाच्या वतीने शनिवार १८ जानेवारी रोजी तालुक्यातील आचार्य नरेंद्र देव विद्यामंदिर भू येथे होणाऱ्या वार्षिक पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराबद्दल शिवाजी कानडे यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
