आजपासून दक्षिण आफ्रिकेत 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाली. यजमान आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्या सामन्यानं स्पर्धेचा शुभारंभ झाला. 9 फेब्रुवारीपर्यंत ही स्पर्धा होणार आहे. भारतीय संघाने चार वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. 2000, 2008, 2012 आणि 2018मध्ये वर्ल्ड कप विजयाचा मान टीम इंडियानं पटकावला आहे. यावेळीही टीम इंडियाला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. 2018मध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली आणि दी वॉल राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियानं जेतेपद पटकावले होते. यंदा प्रियाम गर्गच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानावर उतरणार आहे. पण, भारतासाठी जेतेपद कायम राखणं इतकं सोपं नसेल.
