कुंभार्ली घाटात गोवा मद्यासह १ कोटी २३ लाखांचा मुद्देमाल जप्त; सातजणांना अटक

0

चिपळूण : गोवा बनावटीची दारू घेऊन गोवा ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या ट्रकला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई येथील भरारी पथकाने चिपळूण कुंभार्ली घाट येथे सापळा रचून पकडले. सोमवारी मध्यरात्री १ वाजता ही कारवाई करण्यात आली. यामध्ये दोन कार, एका दहाचाकी ट्रकसह १ कोटी २३ लाख ३ हजार ७० रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल व गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. याप्रकरणी सात जणांना अटक केली आहे. केदारसिंग धनसिंग (२६ वर्षे, ट्रक चालक, हेदलपूर, मालवणी ता. सेहपहू, जि. ढोलपूर, राजस्थान), पवनकुमार राजेश पटेल (२९ वर्षे, आंबेडकरनगर, एल.आय.जी. भदोही, ता. सिहावल जि. मिझापूर, इंदोर मध्य प्रदेश), प्रदीप अर्जुन पाटील ( ४७ वर्षे), प्रकाश अर्जुन पाटील (४७ वर्षे, दोघेही रा. माटेवाडा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग), अजय सूर्यकांत कवठणकर (२३ वर्षे रा. ओटवणे, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग), रोहित दत्ता साळगावकर (२५ वर्षे, रा. कोणगाव ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग), मंदार दत्ता साळगावकर (२९ वर्षे, रा. कोणगावता, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) अशी अटक केलेल्या लोकांची नावे आहेत. त्यांच्याकडून १८० मि.लि. क्षमतेच्या ४८ सीलबंद बाटल्यांनी भरलेले १३५० बॉक्स इतका अवैध विदेशी मद्याचा साठा ट्रकसह जप्त करण्यात आला. तसेच सदर ट्रकसोबत असलेली ह्युंडाई आव १० व ह्युंडाई क्रेटा या दोन कारही जप्त केल्या आहेत. सदर कारवाईमध्ये आरोपींनी संगनमताने गोवा मद्य साठ्याची महाराष्ट्रात अवैध विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या वाहतूक केल्याने त्या सर्व आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ चे कलम ६५ (८०, ८१, ८३ व ९०) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमध्ये निरीक्षक संताजी लाड, निरीक्षक मनोज चव्हाण तसेच दुय्यम निरीक्षक प्रमोद कांबळे व संजय राठोड तसेच दुय्यम निरीक्षक सुरेश पाटील व दुय्यम निरीक्षक शंकर जाधव, दुय्यम निरीक्षक विशाल सकपाळ तसेच जवान सर्वश्री अतुल वसावे, राजेंद्र भालेकर, एस. एन. वड, ए. एन. शेख, धनाजी दळवी, बाळकृष्ण दळवी, रवींद्र पाटील, सोमनाथ पाटील, अमोल चिलगर, सुधीर देसाई यांनी भाग घेतला, तसेच सदर गुन्हा नोंद करण्याकामी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, तसेच शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन कारवाईकरिता मदत केली. याप्रकरणी पुढील तपास निरीक्षक संताजी लाड करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:43 PM 16-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here