मोदींचे नागरिकत्व सिद्ध करणाऱ्या कागदपत्रांची मागणी – आरटीआय

0

देशभरात सध्या नागरिकत्व संशोधन कायद्यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. भाजप यावरून अत्यंत आक्रमक झालेली पहायला मिळत आहे तर विरोधी पक्षांनी याविरोधात रान पेटविले आहे. काही विद्यार्थी संघटना देखील याविरोधात मैदानात उतरल्या आहेत. एका बाजूला हे सर्व सुरु असताना आता एका पठ्ठ्याने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील चालक्कुडीचा रहिवासी असलेल्या जे कल्लुवीट्टिलने त्या व्यक्तीने मोदींचे नागरिकत्व जाणून घेण्यासाठी आरटीआय अर्ज दाखल केला आहे. 13 जानेवारीला राज्याच्या माहिती विभागाला मिळालेल्या पत्रात पंतप्रधान मोदी भारताचे नागरिक आहेत का नाही ?अशी माहिती विचारण्यात आली आहे. या अर्जात मोदींचे नागरिकत्व सिद्ध करणाऱ्या कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. केरळ सरकारने सुप्रीम कोर्टात नागरिकत्व संशोधन कायदा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. याचिका दाखल करणारे केरळ देशातील पहिले राज्य आहे. त्यानंतर आता त्या व्यक्तीने थेट मोदींच्या नागरिकत्वावरच प्रश्चचिन्ह उपस्थित केल्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. यानंतर आता भाजप यावर कोणते पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here