डोक्यात गोळी लागूनही चक्क सात किलोमीटर गाडी चालवून पोलीस स्टेशन गाठत नोंदवली तक्रार!

0

डोक्यात गोळी लागूनही एका महिलेने चक्क सात किलोमीटर गाडी चालवल्याची घटना चंदिगढमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे महिलेने स्वतः गाडी चालवून पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदवली आहे. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या महिलेचं नाव सुमित कौर असं आहे. सुमित आणि तिच्या अल्पवयीन भाच्यात जमिनीवरून वाद सुरू होता. याच वादातून त्याने तिच्यावर आणि तिची आई सुखबिंदर कौर यांच्यावर गोळ्या झाडल्या. डोक्यात तीन गोळ्या आणि चेहऱ्यावर एक गोळी लागूनही सुमित यांनी सात किलोमीटरपर्यंत गाडी चालवत नेली. पोलीस स्टेशन गाठून तिथे आपला भाऊ आणि भाच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. सुमित यांच्या वडिलांच्या मृत्युपश्चात त्यांना आणि त्यांच्या आईला 16 एकर जमीन मिळाली होती. पण, सुमीत यांच्या भावाला ती जमीन हवी होती. म्हणून त्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, असा आरोप सुमित यांनी केला आहे. भाऊ आणि भाच्याने यापूर्वीही आपल्यावर हल्ला केल्याचा दावाही सुमित यांनी केला आहे. सुदैवाने, सुमित यांना वेळीच वैद्यकीय मदत मिळाली. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्यांच्या शरीरातील गोळ्या काढल्या असून त्यांचा आणि त्यांच्या आईचाही जीव वाचला आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here