”महाराष्ट्रात शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही”

0

मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिस्वबळावर निवडणुका लढण्याची घोषणा करण्याची चढाओढ लागल्याच पाहायला मिळत आहे. आधी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कॉंग्रेस राज्यात स्वबळावर लढणार असून आपण मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले नंतर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी देखील भाजप राज्यात स्वबळावरच लढणार असल्याचे जाहीर केले. या दोन पक्षांच्या स्वबळाच्या घोषणेनंतर आता आजच्या सामना अग्रलेखातून महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणाचं भाकित वर्तवण्यात आलंय. भाजप आणि काँग्रेससारखे पक्ष स्वबळाच्या दिशेने तयारी करीत आहेत हे चांगलेच झाले. आता महाराष्ट्रात राहता राहिले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष. सगळेच स्वबळावर लढत असतील तर या दोन प्रमुख पक्षांना महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावे लागेल, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलंय. यावर आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमच्याबरोबर युती करून लढली. केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या करिश्म्याचा फायदा करून घेण्यासाठीच शिवसेना आमच्यासोबत होती. मात्र, शिवसेनेने राष्ट्रवादीसोबतही छुपी युती केली होती, असा गौप्यस्फोट चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची छुपी युती ही गेल्या निवडणुकीतच होती. शिवसेना हा पाठित खंजीर खुपसणारा पक्ष आहे. महाराष्ट्रातून शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार भाजपने केला आहे, असं बावनकुळे यांनी सांगितलं. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे वेगवेगळे पक्ष आहेत. त्यांचे विचार वेगळे आहेत. त्यांनी कुणासोबत युती करावी हा त्यांचा निर्णय आहे. पण जाणीवपूर्वक आणि जाणीवपूर्वक सांगतो, विधानसभेच्या सहा महिन्यांपूर्वीच सेना-राष्ट्रवादीची युती झाली होती. फडणवीसांचा प्रभाव वापरून अधिकाधिक जागा निवडून आणा आणि पळून या. मातोश्रीचे दरवाजे भाजपला बंद करा, असं आधीच ठरलं होतं. तसा अजेंडा तयार करण्यात आला होता. लपून अजेंडा तयार करण्यात आला होता. पूर्वी छुपी युती केली होती, आता उघड केली आहे. तुम्ही कुणाशीही युती केली तरी आम्हाला फरक पडणार नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:47 PM 17-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here