जागतिक कसोटी विजेतेपदाची अंतिम फेरी आजपासून, साऊदम्प्टनच्या मैदानात विराटच्या टीम इंडियासमोर विल्यमसनच्या न्यूझीलंडचं आव्हान

0

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये शुक्रवारपासून म्हणजेच आजपासून जागतिक कसोटी क्रिकेट अर्थात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. क्रीडारसिकांना फार दिवसांपासून याच दिवसाची प्रतीक्षा होती. सामना केव्हा आहे, कोणता संघ या सामन्याचं जेतेपद पटकावेल आणि ‘जगात भारी’ ठरेल, असेच प्रश्न अनेक क्रीडारसिकांच्या मनात घर करत होते. हा सामना भारतीय संघानं जिंकल्यास विराट कोहली याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाच्या वाट्याला आलेलं हे मोठं यश ठरणार आहे. 18 जूनपासून भारत आणि न्यूझीलंड या दोन संघांमध्ये WTC Final 2021 खेळला जाणार आहे. WTC Final 2021 चा हा सामना साऊथम्प्टनमधील एजेस बोल या स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. दरम्यान, आजपासून सुरू होणार्‍या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा झाली आहे. बीसीसीआयने सामन्याच्या एक दिवस आधी अंतिम सामन्यात भाग घेणार्‍या 11 खेळाडूंची घोषणा केली. अंतिम सामन्यात भारताने तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:16 AM 18-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here