सीबीएसई १२वीचे निकाल ३१ जुलैला; मूल्यांकनासाठी ३०:३०:४० टक्क्यांची पद्धत वापरणार

0

नवी दिल्ली : १२वी परीक्षांच्या मूल्यांकनाची पद्धत सीबीएसईने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाला सादर केली व हे निकाल ३१ जुलै रोजी जाहीर करण्यात येतील, असे सांगितले. १०वी, ११वी आणि १२वी या तीन इयत्तांतील गुणांचा विचार करताना ३०:३०:४० टक्के अशा रितीने मूल्यांकन करून विद्यार्थ्याला गुण देण्यात येतील. कोरोनामुळे सीबीएसई १२वीची परीक्षा यंदा रद्द करावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात न्या. अजय खानविलकर व न्या. दिनेश माहेश्वरी यांचा समावेश असलेल्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सीबीएसईने बारावी निकालासंदर्भातील धोरण न्यायालयापुढे स्पष्ट केल्याने विद्यार्थी व पालक यांचा जीव भांड्यात पडला आहे. कोरोना साथ असल्यामुळे विद्यार्थ्यांची आरोग्य सुरक्षा लक्षात घेऊन सीबीएसईच्या १२वीच्या परीक्षा यंदा न घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी जाहीर केला होता.

स्थिती सुरळीत झाल्यास प्रत्यक्ष परीक्षा
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मिळालेल्या गुणांविषयी विद्यार्थ्यांची काही तक्रार असेल तर ती समस्या सोडविण्याची पद्धतीही तयार ठेवा, असे सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसईला सांगितले.
कोरोना साथ आटोक्यात येऊन परिस्थिती सुरळीत होईल, त्यावेळेस १२वीची प्रत्यक्ष परीक्षा घेण्यात येणार आहे. सध्याच्या मूल्यांकन पद्धतीबद्दल समाधानी नसणारे विद्यार्थी या परीक्षेला बसून अधिक उत्तम गुण मिळवू शकतात.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:40 AM 18-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here