सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरावर आयकर विभागाचा छापा

0

प्रख्यात दाक्षिणात्य अभिनेत्री रश्‍मिका मंदाना हिच्या घरावर छापा टाकून प्राप्तीकर विभागाने लाखो रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली. या रोकडशिवाय तिच्या घरातून प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना मालमत्तांची अनेक कागदपत्रेही सापडली. कोडगू जिल्ह्यातील विराजपेठ तेथील तिच्या घरावर प्राप्तीकर विभागाने गुरूवारी छापा टाकला, असे प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या मलमत्तांबाबत तिचे पालक तपशील देऊ शकले नाहीत. त्यांच्याकडे या मालमत्तांबाबत चौकशी करण्यात आली, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. या छाप्यात या अभिनेत्रीच्या घराची तपासणी बुधवारी सकाळी सुरू झाली. ही अभिनेत्री आणि तिच्या पालकांच्या बॅंक अकौंटस्‌चा तपशील पडताळून पाहण्यात येत आहे, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here