कृषी विभागाकडून शेतकरी योजनांवर आतापर्यंतचा खर्च

0

जिल्हा परिषद कृषी विभागाकडून विविध योजनांवर निधी खर्च केला जात आहे. आतापर्यंत या विभागामार्फत १ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्या माध्यमातून अनुदानावर शेतीपयोगी साधने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यंदाच्या पुरवणी बजेटमध्ये कृषी विभागाला २२ लाखाचीच तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे शेवटच्या टप्यात साहित्य खरेदीला निधी कमी पडतो. मूळ बजेटमध्ये जादा निधी दिला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाकडून २०१८-१९ मधील जिल्हा परिषद सेस अंतर्गत शेतकऱ्यांसाठी योजना राबविण्यात येतात. जिल्हा परिषदेच्या मूळ बजेटमध्ये तशी तरतुद केली जाते. त्यानुसार निधी वितरण करण्यात येते. गतवर्षीच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना ताडपत्री ७५ टक्के अनुदानावर उपलब्ध करुन दिली होती. त्यासाठी १० लाख ९८ हजार ६०४ रुपये खर्च केले. सुधारित कृषी औजारे ७५ टक्के अनुदानावर देण्यासाठी ३८ लाख ३८ हजार ७९१ रुपये ठेवले होते. त्यातून ग्रासकटर खर्ची दिले आहेत. पीक संरक्षणासाठी शेतकऱ्यांना पॉवर स्प्रेसाठी १५ लाख रुपये खर्ची टाकले आहेत. शेतकऱ्यांना अनुदानावर पंप पुरवण्यासाठी ५ लाख ५६ हजाराचा निधी होता. सेंद्रीय गाव बनविण्यासाठी जिल्ह्यातील नऊ गावे निवडण्यात आली होती. त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये असे नऊ लाख रुपये वाटप करण्यात आले. ९० टक्के अनुदानावर सुधारित बियाणे खरेदीसाठी ४ लाख २९ हजार रुपये ठेवले होते. त्यातील ४ लाख २८ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. अभ्यास दौऱ्यांसाठी ८ लाख ९२ हजार रुपयांची तरतूद होती. त्यानुसार केरळला शेतकरी दौरा काढण्यात आला होता. सौर पथदीपसाठी ६ लाख ६१ हजार
रुपये खर्ची करण्यात आले. पुरवणी बजेटमध्ये २२ लाख रुपये कृषी विभागाला मिळाले आहेत. त्यातून जादा रक्कम मिळेल अशी अपेक्षा होती; परंतु तेवढा निधी मिळालेला नाही. ही कसर भरुन काढण्यासाठी जादा निधीची तरतूद पुढीलवेळी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here