मोरोशीत १७ वर्षीय मुलाची आत्महत्या

0

राजापूर : मोरोशी काकयेवाडी येथे एका सतरा वर्षीय विवेक विठोबा काकये याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. मयत विवेक याचे आई,वडील हयात नसून तो आपल्या घरी पंधरा वर्षीय छोटी बहीण व दहा वर्षीय भावासह राहत होता. त्याची दोन्ही भावंडे जावडे (ता. लांजा) येथील छात्रालयात होती. मात्र, कोरोनामुळे गेले काही महिने ही भावंडे मोरोशीला घरी परत आली होती. ही तीन भावंडे एकत्र राहत होती. उदरनिर्वाहासाठी विवेक बारिक-सारिक कामे करीत असे. बुधवारी दुपारी दोन ते साडेतीन या वेळात विवेकने आपल्या दोन्ही भावंडांना दुसऱ्या घरी जा. मला येथे झोपायचे आहे, असे सांगून त्याने दोन्ही भावंडांना दुसऱ्या घरी पाठविले. त्यानंतर विवेकने घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.काही वेळाने त्याची बहीण घरी आली असता आत्महत्येचा प्रकार निदर्शनास आला. दरम्यान, मृत विवेकचा चुलतभाऊ महेश बाबू काकये याने राजापूर पोलिस ठाण्यात त्याबाबत खबर दिली. याबाबत पोलिस हेडकाँस्टेबल प्रमोद वाघाटे अधिक तपास करीत आहेत. मृत विवेकच्या आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नव्हते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:06 PM 18-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here