विश्वनाथ परब महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्षपदी

0

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन सिंधुदुर्ग या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी विश्वनाथ अनाजी परब यांची निवड झाली आहे.तर उपाध्यक्षपदी कृष्णा पुरुषोत्तम देसाई, सचिव अभय अशोक सावंत, कोषाध्यक्ष यशवंत देविदास कुबल प्रसिद्धीप्रमुख सिद्धेश सत्यवान गावडे, जिल्हा कार्यकारणी सदस्य अरुण सावंत,आशिष आचरेकर सचिन मगर,बापू परब, भालचंद्र रावराणे, मनोज सावंत, प्रदीप सावंत,सौ.अश्विनी राऊळ, रणजित दत्तदास, उदय कदम, जगदीश पांचाळ, प्रशांत दळवी, सदानंद देसाई ,शैलेंद्र अणावकर,वसंत सावंत ,शरद गावडे ,नामदेव फोंडके यांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा कार्यकारणी या पुढे काम करणार आहे.तसेच प्रलंबित प्रश्नांबाबत शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे.सर्व ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी संघटीत राहून काम करूया असे नूतन अध्यक्ष विश्वनाथ परब यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन जिल्हा सिंधुदुर्गची सभा नुकतीच भालचंद्र महाराज मठ कणकवली येथे आयोजित करण्यात आली होती.या सभेला जिल्ह्यातील ग्राम पंचायत कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन यशवंत कुबल यांनी केले शेवटी सर्वांचे आभार अविनाश गोसावी यांनी मानले.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here