रत्नागिरीतील मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेल्या कामाला वेग येणार ?

0

मुंबई-गोवा महामार्गाचे सिंधुदुर्ग जिह्यातील काम येत्या मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी रत्नागिरी जिह्यातील महामार्गाच्या कामाकडे कंत्राटदाराने पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे काम रखडले होते. पण आता ‘व्हॅन’ या नवीन कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 15 दिवसांत रत्नागिरी जिह्यातील महामार्ग बांधणीचे काम पूर्ण ताकदीने सुरू होईल. मात्र मुंबई -गोवा महामार्ग तयार होण्यास पुढील वर्षीचा मे महिना उजाडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याची आढावा बैठक आज मंत्रालयात आयोजित केली होती. या बैठकीला खासदार सुनील तटकरे, खासदार विनायक राऊत, परिवहनमंत्री व रत्नागिरी जिह्याचे पालकमंत्री ऍड. अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी, आमदार हुस्नाबानू खलिफे, आमदार शेखर निकम उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येत्या 26 तारखेला नियोजन मंडळाची बैठक बोलावली आहे. कोकणासाठी आम्ही उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे जास्तीत जास्त निधी मागणार आहोत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

300 कोटींची मागणी
नियोजन मंडळाचे आराखडे सुमारे 200 कोटी रुपयांचे आहेत. नियोजन मंडळाला 300 कोटी रुपये मिळावे अशी मागणी वित्तमंत्र्यांकडे करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. महामार्गासाठी नवीन कंत्राटदार मुंबई-गोवा महामार्गाचे काम चार टप्प्यांत होत आहे. रत्नागिरी जिह्यातील काम सर्वात जास्त म्हणजे 90 कि.मी.चे काम रखडले आहे. ‘एमईपी’ कंपनीकडे हे काम होते. या कंपनीने बांधकामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या संदर्भात आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटलो. मुंबई-गोवा महामार्गाचे रत्नागिरी जिह्यातील काम ‘एमईपी’ कंपनीकडून दुसऱ्या कंपनीला दिले आहे. रखडलेले काम सुरू झाले आहे. येत्या 15 दिवसांत पूर्ण ताकदीने काम सुरू होईल. रत्नागिरी जिह्यातील काम ‘एमईपी’च्या नाकर्तेपणामुळे थांबले आहे. ते काम पूर्ण होण्यास एक वर्ष लागेल असे सामंत यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here