उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाचे आज मालगुंडला उद्घाटन

0

मराठी विज्ञान परिषदेचा रत्नागिरी विभाग आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने चौपन्नावे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन मालगुंड येथे होत आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते दोन दिवसांच्या या अधिवेशनाचे उद्घाटन झाले. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे निवृत्त संचालक प्रा. हेमचंद्र चिंतामणी प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन होईल. कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधू ङ्कंगेश कर्णिक अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष आहेत. उद्घाटन समारंभात विज्ञानगीत सादर केले जाईल. स्मरणिका आणि ब्रेल पुस्तकाचे प्रकाशन तसेच मन मोहन शर्मा विज्ञान-तंत्रज्ञान पुरस्कार आणि उत्तम विभाग पुरस्कारांचे वितरण यावेळी होईल. विद्यापीठ स्तरावरचा प्रा. मन मोहन शर्मा विज्ञान तंत्रज्ञान पुरस्कार प्रा. वीरेंद्र राठोड (इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई) आणि महाविद्यालयीन स्तरावरचा पुरस्कार प्रा. अविनाश टेकाडे (मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे) यांना देण्यात येणार आहे. मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. ज्येष्ठराज जोशी, कार्यवाह अ. पां. देशपांडे, केशवसुत स्मारकाचे अध्यक्ष गजानन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित. दुपारी दोन वाजता उच्च शिक्षणातील संधी या विषयावरचे चर्चासत्र प्रा. हेमचंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली होईल. त्यामध्ये डॉ. विवेक पाटकर, प्रा. सुधीर पानसे, प्रा. भालचंद्र भणगे, प्रा. नागेश टेकाळे सहभागी होतील. सायंकाळी साडेचार वाजता आंबा, फणस आणि काजूची उपयुक्तता या विषयावर प्रा. रेखा सिंघल यांचे व्याख्यान होईल. सायंकाळी साडेपाच वाजता सन्मानकरी आणि मनमोहन शर्मा पुरस्कार विजेत्यांशी वार्तालाप होईल. रात्री आठ वाजता मधू ङ्कंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली होणार्याप कवितावाचनाचे संयोजन कवी अरुण म्हात्रे करणार असून त्यामध्ये अशोक नायगावकर, नमिता कीर आणि कैलास गांधी सहभागी होतील. त्याचवेळी स्थानिक विद्यार्थी आणि सर्वांसाठी आकाशदर्शनाचा कार्यक्रम होईल. त्याचे संयोजन मुंबईच्या खगोल मंडळाचे दिलीप जोशी आणि रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा भौतिकशास्त्र विभाग करणार आहे. रविवारी सकाळी दहा वाजता उद्योगधंदे आणि भविष्यातील संधी या विषयावर स्थानिक कारखानदारांचा सहभाग असलेले चर्चासत्र होईल. दुपारी बारा वाजता आपत्ती व्यवस्थापन या विषयावर व्याख्यान, तर दुपारी दोन वाजता महिलांसाठी घरगुती व्यवसाय या विषयावर चर्चासत्र होणार आहे. सायंकाळी चार वाजता विज्ञानप्रसारकांकडून विज्ञानवारीची माहिती दिली जाईल. संध्याकाळी साडेपाच वाजता खुले अधिवेशन पार पडेल. त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता विज्ञान एकांकिका सादर केली जाणार आहे.अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी विज्ञान परिषद आणि कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here