मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन महिला योगा स्पर्धेत येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची श्रुती जाधव हिला रौप्य पदक मिळाले. तिची अखिल भारतीय आंतरमहाविद्यालयीन महिला योगा स्पर्धेकरिता निवड झाली आहे. मुंबई विद्यापीठ आणि मुंबईतील चर्चगेट येथील के. सी. जैन महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ पॉवरलिफ्टिंग स्पर्धेतून याच महाविद्यालयाची प्रतीक्षा साळवी हिची मुंबई विद्यापीठ संघात निवड झाली आहे.
