राज्य शासनाकडून जिल्ह्यासाठी पदानियुक्तीने चार तज्ज्ञ अधिकाऱ्यांची टीम नियुक्त

0

रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर कमी होत असला तरीही बाधितांची संख्या पाचशे ते सहाशेपर्यंतच आहे. चाचण्या वाढविणे आणि लसीकरण कार्यक्रम वेगाने राबविण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागासह जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दिमतीला पदनियुक्तीने चार तज्ज्ञ अधिकाऱ्यांची टीम राज्य शासनाकडून नियुक्त केली आहे. त्या चौघांनाही तत्काळ रत्नागिरीत रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. हे पत्र आरोग्य सेवा संचालनालयाकडून काढण्यात आले आहे. डॉ. बबिता कमलापूरकर यांच्या जागी प्रतिनियुक्तीने जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. अनिरुध्द आठल्ये यांची नियुक्ती केली गेली आहे. तसेच बीडच्या जिल्हा माता बाल व संगोपन अधिकारी डॉ. स्वाती बाळकृष्ण कांबळे यांची जिल्हा रुग्णालय येथे निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) म्हणून नियुक्ती केली आहे. सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून वाशिम येथील अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख, कोविड व्यवस्थापनेत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सहकार्य म्हणून नाशिकचे डॉ. गोविंद चौधरी, पुणे येथील सहायक संचालक डॉ. दिलीप माने यांचा समावेश आहे. या चारहीअधिकाऱ्यांनी दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी तात्काळ रुजू व्हावे आणि तसा अहवाल संबंधितांना सादर करावा, अशा सुचना आरोग्य संचालनालयाने केल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
12:28 PM 19-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here