राऊतांच्या बेळगाव दौऱ्यावर संपुर्ण महाराष्ट्राचं लक्ष

0

कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना बेळगावात हुतात्म्यांना अभिवादन करण्यापासून रोखल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत. मी बेळगावला जाणारच आहे. मला कायद्याने रोखा, असं आव्हानच संजय राऊत यांनी पोलिसांना दिलं आहे. तसेच संजय राऊत यांच्या बेळगावमधील प्रकट मुलाखतीला बेळगाव पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा बेळगावमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच ‘मी भारताचा नागरिक आहे, बेळगावात जाणार आणि तेथील लोकांशी बोलणार,’ असा निर्धार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत बेळगावला रवाना झाले आहेत. दरम्यान, संजय राऊत आज सायंकाळी 4 वाजता बेळगावात पोहचतील. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता संजय राऊत यांची गोगटे रंग मंदिर येथे प्रकट मुलाखत होणार आहे. बेळगावमध्ये संजय राऊत बेळगाव सार्वजनिक वाचनालयाने आयोजित केलेल्या बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचं उदघाटन करतील.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here