क्लिकइन ॲपला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद

0

रत्नागिरी : दिनांक 13 जुन रोजी लोकार्पण करण्यात आलेले Clickinn ॲप मोठमोठ्या ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांना टक्कर देण्यासाठी आता सज्ज झालंय. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी या ॲपचे लोकार्पण केलं आहे. सध्या ऑनलाईन खरेदी चे प्रमाण खूप वाढलंय आणि मागील वर्षभरातच रत्नागिरीतील ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन खरेदी केली होती. परंतु रत्नागिरी मधील ग्राहकांना नेहमी मदत करणारे स्थानिक व खात्रीचे व्यापारी ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये नसल्याने रत्नागिरीतील व्यापारी या सर्व व्यवहारापासून वंचित राहिले होते. Clickinn ॲप मुळे ग्राहकांना आपल्या नेहमीच्या खात्रीच्या दुकानातून खरेदीचा पर्याय आता उपलब्ध झाला आहे. या ॲपच्या ऑनलाईन लोकार्पण कार्यक्रमात ना. सामंत म्हणाले होते की सध्याच्या परिस्थितीत या ॲपला खूप महत्व आहे. रत्नागिरीतील व्यापाऱ्यांना आर्थिक आधार या ॲपमुळे मिळणार आहे. विशेष म्हणजे हे ॲप स्थानिक मुलांनी तयार केले आहे हे खूप महत्वाचे आहे. या Clickinn ॲपचा वापर करीत स्थानिक व्यापाराला चालना मिळणार आहे व रत्नागिरीतील व्यवसाय रत्नागिरी मध्येच राहणार आहे. Clickinn ॲप विनामूल्य उपलब्ध असून स्थानिक दुकानदार मोठ्या संखेने सहभागी झाले आहेत या स्थानिक दुकानदारांची खात्रीची सेवा, मालाची गरेंटी, विक्री पश्चात देखभाल आँनलाईन खरेदीतील केवळ Clickinn ॲप मधील खरेदीवर उपलब्ध होणार आहेच परंतु सर्व ग्राहकांना पहिल्या ऑर्डर सोबत N95 मास्क आणि नारळ पाणी घरपोच भेट देण्यात येत आहे. केवळ एकच दिवसात clickinn ॲप एक हजार हून जास्त डाऊनलोड झाले असून जवळपास शुभारंभाच्या दिवशीच अनेक ऑर्डर्स ची पूर्तता केल्याची माहिती ॲप चे विपणन व्यवस्थापक श्री भंडारे यांनी दिली आहे.
Clickinn ॲप मध्ये स्थानिक व्यापारी मोठ्या प्रमाणात दाखल होत असून अमेझॉन, फ्लिपकार्ट अशा बलाढ्य ॲप पेक्षा आपले घरचे स्थानिक दुकानदार खात्रीची घरपोच सेवा, विक्री पश्चात सेवा त्वरित आणि स्पर्धात्मक दरात देत असल्याने येणाऱ्या काळात रत्नागिरीचा ग्राहक clickinn ॲप वरच खरेदी करेल असे दिसू लागेल आहे. सध्या ग्राहकांची किराणा माल, फळे, कपडे, ड्राय फ्रूट, देवपूजा साहित्य आदी खरेदीची लगबग Clickinn ॲप वर दिसून येत आहे.
Clickinn ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक आहे
https://play.google.com/store/apps/details?id=mspiron.click.inn

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
1:31 PM 19-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here