राज्यभरात थंडीचा कडाका कायम

0

राज्यभरात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना मफलर, स्वेटर, कानटोपी घालणे भाग पडत आहे. तर मुंबईतील आजचे तापमान 21 अंश सेल्सिअस, औरंगाबाद (Aurangabad) येथे 8.1 अंश सेल्सिअस तर निफाड (Niphad) येथील तापमानाचा पारा 5 अंश सेल्सिअसवर पोहचला आहे. त्यामुळे शहरात धुक्यांची चादर पसल्यासारखे वातावरण झाले आहे. येत्या पुढील आठवड्यात तापमानाचा पारा खाली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यंदाच्या थंडीच्या मौसमातील मुंबईतील तापमानाचा पारा अगदीच खाली गेल्याचे दुसऱ्यांचा दिसून आले आहे. जळगाव येथे तापमान 7 आणि मालेगाव येथे तापमानाचा पारा 8.2 अंश सेल्सिअसवर पोहचला आहे. नवं वर्षाच्या सुरुवातीला मुंबईतील तापमानाचा पारा 15.3 अंश सेल्सिअसवर पोहचला होता. तर गुरुवारी कल्याण येथे तापमानाचा पार 13 अंश, सांताक्रुझ येथे शुक्रवारी तापमान 11.5 अंश सेल्सिअसवर पोहचले होते. पुढील काही दिवस मुंबई सह महाराष्ट्रात थंडी कायम राहणार आहे. या काळात आभाळ निरभ्र राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे हवामान कोरडे असल्याचे दिसून आले. वातावरणातील गारवा कायम असल्याने थंडीची झळ अधिकच बसत आहे. निफाड आणि महाबळेश्वरमध्ये दवबिंदू गोठल्याचं चित्र आहे. तर आज दिल्ली मध्ये 11 डिग्री आणि उत्तर प्रदेश मध्ये 13 डिग्री वर तापमान उतरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here