गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे बँकेत निवड

0

रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘करिअर गाईडन्स आणि प्लेसमेंट सेल’ मार्फत आय.सी.आय.सी.आय. बँक आणि एन.आय.आय.टी., मुंबई यांच्या सहकार्याने घेतलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये महाविद्यालयाच्या त्रिवेणी माळवदे, ऐश्वर्या मांडवकर, निधी जाधव, साईराज सावंत, स्वरदा देशमुख, शीफा बोबडे, अभिषेक साळवी या विद्यार्थ्यांची आय.सी.आय.सी.आय. बँकेत ‘सिनिअर ऑफिसर’ या पदावर नेमणूक झाली आहे. निवड प्रक्रियेमधील विविध टप्पे आणि त्यांनंतरचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून त्यांची बँकेत नेमणूक करण्यात आली आहे. सर्व यशस्वी विद्याथ्यांचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांन अभिनंदन केले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या यशामध्ये प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मोलाचे योगदान असल्याचे नमूद करून प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी भविष्यातही असे उपक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जातील असा विश्वास व्यक्त केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here