कोरोना संपेपर्यंत मुंबई लोकल सुरू होणार नाही : विजय वडेट्टीवार

0

मुंबई: कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना मुंबईकरांसाठी लाइफलाइन असलेली लोकल सेवा केव्हा सुरू होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यातच लोकलबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्वाचं विधान केलं आहे. कोरोना संपेपर्यंत मुंबईत लोकल सुरू होणार नाही, असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मुंबईकरांचा लोकलचा प्रवास आता अजून लांबण्याची चिन्हं आहेत.

“राज्यातून कोरोना गेलेला नाही. सर्वांनी कोरोनाचे नियम पाळावेत. मुंबई ही राज्याची राजधानी आहे. गर्दीचं ठिकाण आहे. त्यामुळे कोरोना संपेपर्यंत मुंबईत लोकल सुरू होणार नाही”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी अद्याप सुरू करता येणार नाही असं म्हटलं होतं. पण मुंबईतील कोरोनाची स्थिती कमी झाल्यास सविस्तर बैठक घेऊनच लोकलबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी अजून प्रतिक्षा करावी लागणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:31 PM 21-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here