संगमेश्वर : संगमेश्वर मध्ये असा कोणताही स्ट्रेन सापडला नसल्याचा खुलासा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केला आहे. संगमेश्वरमध्ये डेल्टा सदृश्य स्ट्रेन सापडल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या यावर खुलासा करण्यासाठी आज जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले कि संगमेश्वर गावात वेगळा स्ट्रेन आहे का ? याची तपासणी चालू आहे. शासनाचे हे धोरण आहे. या धोरणाप्रमाणे करण्यात येणाऱ्या तपासणीत ५० ते ५२ नागरिक बाधित आढळले होते. अशा पद्धतीने सर्वच ठिकाणी म्युटेशन वर अभ्यास केला जातो. या धोरणाप्रमाणे संगमेश्वरमध्ये तपासणी होत आहे. तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
01:19 PM 21/Jun/2021