आजपासून ‘द युनिक’ अकॅडमीच्या कणकवली शाखेतर्फे ५० तासांची कार्यशाळेला प्रारंभ

0

५ एप्रिल रोजी होणाऱ्या एमपीएससी पूर्व परिक्षेतील सीसॅट व सामान्य अध्ययन या विषयासाठी प्रत्येकी ८ दिवसांची म्हणजेच सुमारे ५० तासांची कार्यशाळा १८ पासून ‘द युनिक’ अकॅडमीच्या कणकवली शाखेतर्फे घेण्यात येणार आहे. उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, बीडीओ, सीओ, डीवायएसपी, सीईओ, नायब तहसिलदार, उपशिक्षणाधिकारी इ. पदांसाठी दरवर्षी राज्यसेवा परिक्षा घेतली जाते. यावर्षीही २०० पदांसाठी एमपीएससी ची जाहिरात झालेली असून भविष्यात या पदांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. या परिक्षेसाठीचा पहिला टप्पा म्हणजेच पूर्व परिक्षा ५ एप्रिल २०२० रोजी होणार आहे. यासाठी सामान्य अध्ययन व सी-सॅट अशा दोन पेपरचा अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागतो. ज्या विद्यार्थ्यांना तयारीसाठी कमी वेळ मिळतो किंवा ज्यांना नियमितपणे क्लास लावणे शक्य होत नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना परिक्षेची तयारी करणे सोपे जावे यासाठी या दोन विषयांच्या फास्टट्रॅक बॅचेस कणकवली शाखेत घेण्याचे नियोजित आहे. यासाठी ‘द युनिक’ पुण्याचे तज्ञ व अनुभवी मार्गदर्शक लाभणार आहेत. दि. १८ व १९ जाने. रोजी राजेंद्र लाड यांचे मराठी उताऱ्यांचे आकलन आणि दि.२४ जाने. रोजी संतोष जाधव यांचे इंग्रजी उताऱ्याचे आकलन या विषयांचे मार्गदर्शन होईल. दि.२५ व २६ जाने. रोजी हर्षल लवंगारे यांचे निर्णयक्षमता आणि ७,८,९ फेब्रु. रोजी नागेश शिंदे यांचे गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे मार्गदर्शन होईल. दररोज ६ तास सराव व तयारी करून घेतली जाईल. याचप्रमाणे सामान्य अध्ययन या पेपरच्या सर्व विषयांचे लेक्चर्स होणार आहेत. तसेच एमपीएससी पूर्व परिक्षेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात ‘द युनिक’ तर्फे घेतली जाणारी ३० पेपरची सराव चाचणी कणकवली शाखेत ही सुरू आहे, दि.२६ जाने, रोजी स.११.३० वाजता एमपीएससी पूर्व परिक्षेच्या सामान्य अध्ययन व सीसॅट या दोन्ही पेपरबाबत विस्तृत विवेचन पुण्याचे तज्ञ मार्गदर्शन हर्षल लवंगारे करणार असून ही कार्यशाळा सर्व विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी मोफत व परिक्षाभिमुख असणार आहे. कोकणातील विद्यार्थ्यांमधून वर्ग १ व २ दर्जाचे अधिकारी निर्माण होण्यासाठी मागील तीन वर्षापासून कणकवली शाखेचे प्रयत्न व नागरिकांचे प्रोत्साहन उत्साहवर्धक व विश्वासार्ह ठरत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here