google chrome चे अॅप होणार बंद ?

0

जगातील कोट्यवधी इंटरनेट वापरकर्ते वेब ब्राऊझर म्हणून गुगल क्रोम अॅपचा वापर करतात. गुगलने हे अॅप लोकांसाठी मोफत उपलब्ध करून दिले आहे. मात्र हे अॅप आता बंद होणार आहे. गुगलने याबाबतची माहिती दिली आहे. कंपनी मार्च 2020 पासून याचे सबमिशन बंद करणार आहे. सबमिशन बंद झाल्यास, डेव्हलपर्स या प्लॅटफॉर्मवर नवीन अ‍ॅप्स अपलोड करू शकणार नाहीत. मात्र जुने अॅप अद्याप सुरूच राहणार आहेत. गुगलने दिलेल्या माहितीनुसार, जून 2022 पासून Google Chrome अॅप्स कार्य करणार नाहीत. तसेच विंडोज, मॅक आणि लिनक्स सारख्या सर्व ठिकाणचे अॅप्सचे सपोर्ट जून 2020 पासून बंद केले जाईल. मात्र शिक्षण आणि एंटरप्राइझ ग्राहकांसाठी हे अॅप्स डिसेंबर 2020 पर्यंत सुरु राहणार आहेत. गुगल अॅपचे स्वतःचे स्टोअर आहे जिथे हे अॅप्स उपलब्ध आहेत. गूगलच्या मते, क्रोम अॅप्सची जागा आता वेब अ‍ॅप्स घेतील.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here