देवरूखमध्ये २४ रोजी ओबीसींचा मोर्चा

0

देवरूख : ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. यासाठी २४ रोजी राज्यातील सर्व तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले आहे. यानुसार संगमेश्वर तालुका ओबीसींच्यावतीने देखील निवेदन दिले जाणार आहे. याचे नियोजन करणारी बैठक देवरूख येथे नुकतीच पार पडली. शहरातील कुणबी भवन येथे ही बैठक अध्यक्ष शरदचंद्र गीते, सुरेश भायजे, नारायण भुरवणे यांच्या पुढाकाराने घेण्यात आली. यावेळी ओबीसी जनमोर्चा अध्यक्ष प्रकाश शेंडगे व कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी निदर्शने व आंदोलने २४ रोजी होणार आहेत. याबाबत सर्वानुमते चर्चा करण्यात आली. ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. नेहमीच ओबीसी समाजावर अन्याय करणाऱ्या राज्य सरकारला व सर्वच राजकीय पक्षांना जागे करण्यासाठी कोरोनाचे सर्व नियम पाळून शिस्तबध्द आक्रोश आंदोलन महाराष्ट्रभर करण्यात येणार आहे. ३५८ तहसील कचेरीवर मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे. न्याय्य मागण्यांसाठी मैदानात उतरण्याची गरज आहे. शासनाला आता ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन ओबीसी जनमोर्चा संगमेश्वर-देवरूख तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:37 PM 22-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here