तेरा हजार रुपयांसह प्रौढाची बॅग हिसकावली; शिवीगाळ करत ठार मारण्याचीही दिली धमकी

0

रत्नागिरी : शहरानजीकच्या नाचणे येथे प्रौढाची बॅग हिसकावून जबरदस्तीने रोख १३ हजार रुपये तरुणाने काढून घेतले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना शनिवार १९ जून रोजी सायंकाळी ५.१५ वा. सुमारास घडली. शाहीद सादिक मुजावर (३२, रा. बेलबाग धनजीनाका, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरोधात किशोर जगदीश बोरकर (४५, रा.चिंचखरी, रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार शनिवार सायंकाळी ते नाचणे येथील शिवसेना शाखेशेजारी आले असता शाहिदने त्यांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकीही दिली

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:36 PM 22-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here