राजकीय समीकरण बदलताना दिसली की शरद पवार भूमिका घेतात : नाना पटोले

0

मुंबई : देशाच्या राजकरणात मोठीच घडामोड होत असल्याचं चित्र पाहायला मिळतय राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांची दुसऱ्यांदा भेट घेतली आहे. त्यानंतर शरद पवार (२२जून) ला मंगळवारी १५ विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी बैठक घेणार असल्याचं सध्याच वृत्त आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून असणार आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना टोलेंनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीये. शरद पवार हे भाजप विरोधी पक्षांची मोट बांधत असल्याबाबत पटोलेंना विचारलं. यावर बोलताना शरद पवारांचा पहिला प्रयत्न नाही. ज्या ज्या वेळी राजकीय समीकरण बदलतात, राजकारणात वेगवेगळे वारे वाहू लागतात त्या वेळी शरद पवार अशा भूमिका घेतात, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. शरद पवारांचा हा काही पहिला प्रयत्न नाही. त्यामुळे याला काही नवीन म्हणणं हे चुकीचं असल्याचंही पटोले म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
1:49 PM 22-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here