बारमध्ये गर्दी चालते, कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको?; फडणवीसांचा संताप

0

मुंबई : राज्य सरकारने दोनच दिवसाचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भडकले आहेत. बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको?, असा संतप्त सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. अधिवेशन आल्यावरच कोरोनाचं कारण कसं दिलं जातं? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.अधिवेशनाची तारीख ठरवण्यासाठी आज बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, केवळ 5 आणि 6 जुलैला अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय अधिवेशनात प्रश्नोत्तर, तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी न घेण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे फडणवीस यांनी या निर्णयाला विरोध करत सभात्याग केला. त्यानंतर मीडियासमोर येऊन त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. जेव्हा जेव्हा अधिवेशन जवळ येतं, तेव्हा कोरोना वाढल्याच्या बातम्या येतात किंवा राज्य सरकारकडून तशा भूमिका मांडल्या जातात. कोरोनाचा बहाना पुढे घेऊन राज्याचं अधिवेशनच घेऊ नये असा सरकारचा प्रयत्न आहे. केवळ दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:29 PM 22-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here