विद्यार्थी नेता उमर खालिद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जागा…..

0

पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना विद्यार्थी नेता उमर खालिद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीका केली आहे. एक घोषणा २०१४ च्या आधी दिली जात होत होती. देखो देखो कौन आया गुजरात का शेर आया, गुजरात येथील वाघ २०१४ नंतर दिल्लीच्या संसदेत बसला आणि पंतप्रधान झाला. आम्हाला वाघ नको होता. आम्ही तर एक माणूस मागितला होता. वाघ तर माणसांना खाऊन टाकतो. गुजरात येथील हा नमुना जर वाघ आहे. तर त्यांची खरी जागा प्राणी संग्रहालयात असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी शहीद हेमंत करकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी यावेळी केली आहे. पुढे खालिद म्हणाले, मी महाराष्ट्र पोलिसांना सलाम करतो, महाराष्ट्रात काही दिवसांपासून नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. एक उदाहरण महाराष्ट्र पोलिसांनी ठेवले. कारण, यूपी, आसामसह ज्या राज्यात भाजपाची सत्ता आहे. तिथे पोलीस लाठीचार्ज करत असल्याचा आरोप देखील भाजपवर केला आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here