यू-मुम्बाने पुणेरी पलटनवर 33-23 असा विजय

0

मुंबई : अभिषेक सिंग (5 गुण) व अर्जुन देशवाल (5 गुण) यांनी केलेल्या जोरदार कामगिरीच्या जोरावर प्रो कबड्डी लीग स्पर्धेत यू-मुम्बाने पुणेरी पलटन संघावर 33-23, असा विजय मिळवत चमक दाखवली. वरळीच्या एनएससीआय स्टेडियम येथे पार पडलेल्या या स्पर्धेत पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी बचावात्मक खेळ केला. शिंदेने अभिषेक सिंगला बाद करत पुण्याला 2-3 अशी आघाडी मिळवून दिली. फजलने आठव्या मिनिटाला सुपर टॅकल करत चमक दाखवली. अभिषेक सिंगने 17 व्या मिनिटाला सुपर टॅकलने सुरजित सिंहचा टॅकल केला. यू-मुम्बाला पहिल्या सत्रात 11-9 अशी आघाडी घेतली. दुसर्‍या सत्रात यू-मुम्बा संघाने 21 व्या मिनिटाला 15-9 अशी आघाडी मिळवली. यू-मुम्बा संघाच्या अर्जुन देशवालने सुपर सब म्हणून मैदानात येत मनजित व सुरजित सिंहला बाहेर केले. पुण्याच्या सुशांत पालला यू-मुम्बाच्या बचावफळीने बाद केले. यानंतर यू-मुम्बाने 31-21 अशी आघाडी घेतली. संघाने अखेरपर्यंत ही आघाडी कायम ठेवत 33-23 असा विजय मिळवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here