रुग्णाच्या डोळ्याखालचा भाग चक्क उंदराने कुरतडला; राजावाडी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

0

मुंबई : पालिकेच्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल रुग्णाच्या डोळ्याखालचा भाग चक्क उंदराने कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिले आहेत. दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर यांनी राजावाडी रुग्णालयात जाऊन घडलेल्या प्रकाराबाबत माहिती घेतली तसेच असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचेही निर्देश दिले. पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात संबंधित रुग्णाला प्रकृती अत्यवस्थ झाल्याने दोन दिवसांपूर्वी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यावर आवश्यक उपचारही सुरू होते. मात्र सोमवारी रात्रीच्या सुमारास उंदराने रुग्णाच्या डोळ्याखालचा भाग कुरतडला असल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी नातेवाईकांच्या निदर्शनास आला.

राजावाडी रुग्णालयाच्या तळमजल्यावर आयसीयू असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे रात्रीच्या सुमारास दरवाजा उघडला असता उंदीर आत आला असावा असा अंदाज महापौरांनी व्यक्त केला. महापौरांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावाही घेतला. संबंधित रुग्णाच्या डोळ्यावर डोळ्याच्या स्पेशालिस्ट डॉक्टरकडून उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार मामा लांडे, अधीक्षिका डॉ. ठाकूर उपस्थित होत्या.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:06 AM 23-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here