राहत्या घरी मोबाईल फोनवर पबजी गेम खेळत असताना झटके येऊन बेशुद्ध झाल्याने रुग्णालयात दाखल केलेल्या एका 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवारी) रावेत येथे घडली. हर्षल देविदास मेमाणे (वय 23, रा. शिंदेवस्ती, रावेत) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. हर्षल गुरुवारी सायंकाळी चार वाजता राहत्या घरी मोबाईल फोनवर पबजी गेम खेळत होता. गेम खेळत असताना हर्षल याला झटके आल्याने तो बेशुद्ध पडला. त्याला तत्काळ उपचारासाठी रावेत येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. हर्षल याच्या नातेवाईक अश्विनी भोंडवे यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. हर्षल याच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज शनिवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास हर्षलचा मृत्यू झाल्याचे, रावेत पोलिसांनी सांगितले.
