नवज्योत सिंग सिद्धू ‘आप’च्या वाटेवर असल्याची चर्चा

0

नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसचे नेते आणि क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू लवकरच आम आदमी पार्टीत दाखल होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पंजाब काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून धुसफुस सुरू आहे. दोन्ही गटाचे वाद विकोपाला गेले आहेत. माझ्यासाठी चर्चेचे दरवाजे बंद करणारे अमरिंदरसिंग कोण, असा प्रश्न नवज्योत सिद्धू यांनी उपस्थित केला. पक्षाचे सर्व 78 आमदार आपल्या पाठीशी असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. अमरिंदरसिंग यांचे काँग्रेस पक्षात चांगले वजन असल्याने, आपला टिकाव लागणार नाही, हे सिद्धूंनी चांगलेच ओळखले असून, निवडणुकीच्या तोंडावर ते आपमध्ये जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यापार्श्वभूमीवर पंजाबमध्ये पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार शीख असेल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकतेच जाहीर केले होते. दरम्यान सिद्धू आपमध्ये येणार का याविषयी केजरीवाल यांनी कुठलेही अधिकृत भाष्य केलेले नाही.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:10 PM 23-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here