“पेट्रोल-डिझेल 100 पार, इंधन दरवाढीसाठी काँग्रेस जबाबदार”

0

नवी दिल्ली : सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती परस्परांशी स्पर्धा करू लागल्या आहेत. पेट्रोलने शंभरी कधीच पार केली आहे. तर काही ठिकाणी नव्वदीत असलेले डिझेलही शतक झळकावण्याच्या तयारीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्य्या तेलाच्या किमतींमुळे पेट्रोल-डिझेल महागले आहे. पुढील वर्षापर्यंत कच्चे तेल 100 डॉलर प्रतिबॅरेल एवढे महाग असेल, असा तज्ज्ञांचा होरा आहे. कोरोनाच्या संकटात इंधन दरवाढीचा भडका उडाला असून सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार आला आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ होत आहे. याच दरम्यान केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी या इंधन दरवाढीबद्दल खुलासा केला आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीसाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काँग्रेसला जबाबदार धरलं आहे. इंधन दरवाढीचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. अशातच “पेट्रोल-डिझेल 100 पार आणि इंधन दरवाढीसाठी काँग्रेस जबाबदार” असल्याचं म्हणत धर्मेंद्र प्रधान यांनी गंभीर आरोप केला आहे. “काँग्रेसने 2014 पूर्वी ऑईल बाँडच्या रुपाने आमच्यावर कोट्यावधी रुपयांचे कर्ज सोडले, त्यामुळे आता आपल्याला मूळ रक्कम आणि व्याज भरावे लागणार आहे. हे तेलाच्या किंमतीतील वाढीचे एक प्रमुख कारण आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. आपल्या आवश्यक असणारे 80 टक्के तेल बाहेरून आयात करावे लागते” असं देखील धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
03:30 PM 23/Jun/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here