डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना भाजपतर्फे अभिवादन

0

रत्नागिरी : जम्मू व काश्मीरच्या संपूर्ण विलीनीकरणासाठी जनसंघाचे संस्थापक कै. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी अभियान सुरू केले होते. त्यानंतर तिथे तुरुंगातच त्यांचा मृत्यू झाला. आज ७० वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३७० कलम रद्द करून दाखवले. त्यांचे हिंदुत्व परखड होते. शिक्षण आणि अर्थचक्राच्या माध्यमातून शाश्वत विकासाचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. आज त्यांची ही स्वप्ने केंद्रातील भाजप सरकार स्वप्न पूर्ण करत आहेत, असे प्रतिपादन द. रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले. भाजप कार्यालयात डॉ. मुखर्जी यांच्या स्मृतीदिनानिमित्त ते बोलत होते. या वेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ प्रमुख उपस्थित होत्या. देशासाठी डॉ. मुखर्जी यांनी बलिदान दिले आहे. त्यांचे प्रत्येक कार्यकर्त्याने घेतले की रोमांच उभे राहतील एवढे काम भारतमातेसाठी त्यांनी केले आहे. २१ ऑक्टोबर १९५१ रोजी मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. नंतर जनसंघाचे भाजपमध्ये रुपांतर झाले. त्या काळात त्यांनी ठरवलेली उद्दिष्टे आज पूर्ण होत आहेत, असे अॅड. पटवर्धन यांनी सांगितले. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत डॉ. मुखर्जी जनसंघातर्फे लोकसभेवर निवडून आले. संसदेत त्यांनी विरोधी पक्षांची एक राष्ट्रीय लोकशाही आघाडी स्थापन केली. त्याचे नेतृत्व त्यांच्याकडे आले. जम्मू व काश्मीरच्या संपूर्ण विलीनीकरणासाठी अभियान सुरू केले. या आंदोलनानिमित्त प्रत्यक्ष काश्मीरमध्ये जाऊन प्रचार करण्याचा त्यांनी निश्चय केला. जम्मू-काश्मीरचे तत्कालिन मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांच्या शासनाने त्यांच्या राज्यप्रवेशावर बंदी घातली. बंदी मोडून जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना अटक झाली. तुरुंगवासातच त्यांचा अंत झाला. या वेळी चित्रा वाघ यांनी ओबीसी समाजाचे आरक्षण किती महत्त्वाचे आहे, या विषयावर माहिती दिली. आरक्षण टिकले नाही तर भविष्यात वाईट परिस्थिती उदभवू शकते. त्याकरिता आपण सजग राहिले पाहिजे. ओबीसी आरक्षणासाठी भाजप २६ जूनला रस्त्यावर उतरणार आहे. या कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या जठार, राजेश सावंत, यशवंत वाकडे, राजन कापडी, अनिकेत पटवर्धन, सचिन करमरकर, अॅड. महेंद्र मांडवकर, प्राजक्ता रुमडे, मनोज पाटणकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:36 PM 23-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here